
शहरातून वाहणाऱ्या मुठा-मुळा नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘वी पुणेकर’ या संस्थेने स्वच्छ नदी चळवळ सुरू केली आहे. त्याची सुरवात रविवारी (ता. ८) बाबा भिडे पूल येथे मुठा नदीची आरती करून करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.
गणेशोत्सव2019 : पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुठा-मुळा नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘वी पुणेकर’ या संस्थेने स्वच्छ नदी चळवळ सुरू केली आहे. त्याची सुरवात रविवारी (ता. ८) बाबा भिडे पूल येथे मुठा नदीची आरती करून करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.
शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा दोन्ही नद्या बिकट स्थितीत आहेत. त्यांना स्वच्छ करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न देखील केले जात आहेत.
त्याचबरोबर सजग पुणेकरांकडून देखील नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्यातीलच एक ‘वी पुणेकर’ ही संस्था असून, त्यांनी ‘स्वच्छ नदी चळवळ’ सुरू केली आहे. त्याची सुरवात आज बाबा भिडे पूल येथे मुठा नदीची आरती करून करण्यात आली.
आरतीमध्ये कॅनडातील दोन महिलांनीही या चळवळीत सहभाग घेतला. या वेळी संस्थेचे पराग मते, भोला वांजळे, अमित कुमार खांडेकर, सुवर्णा तापकीर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.