Video : दगडुशेठ हलवाई गणपतीचा भक्तांना निरोप; पुढच्या वर्षी लवकर या!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

यावर्षी दगडुशेठ गणपतीचे मनमोहक रूप विकटविनायक रथात विराजमान होते. असंख्य रंगांनी या रथाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती. 

पुणे : पुण्याचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा दगडुशेठ हलवाई गणपतीला सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी निरोप देण्यात आला. यावर्षी दगडुशेठ गणपतीचे मनमोहक रूप विकटविनायक रथात विराजमान होते. असंख्य रंगांनी या रथाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती. 

पुण्याच्या अलका चौकात बाप्पाची आरती करण्यात आली. तसेच मोरया मोरच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. 

दगडुशेठ मंडळाच्या रथाचे सारथ्य पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. 

ganpati


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immersion of Dagadusheth halwai ganpati at pune