पुण्यात दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

पुणे 'गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महापालिकेच्या हौदांसह नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते.

पुणे : पुणे 'गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महापालिकेच्या हौदांसह नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.
सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते.ganesha

पुण्यात अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी या गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानुसार मंगळवारी (ता. 3) सकाळी गणपतीची पूजा, आरती करून व नैवेद्य दाखविला. त्यानंतर महापालिकेने ठिकठिकाणी बांधलेल्या विसर्जन हौदात व नदीच्या घाटावर बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन सुरू होते. महापालिकेने नदीच्या घाटावर विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. साधारणपणे १५०० मुर्तींचे आज विसर्जन होते. या आधी अर्ध्या दिवसाच्या ६४४ मुर्तींचे काल विसर्जन झाले आहे.ganesha

सोमवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून 3 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली होती. विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशामक दलाचे जवान व जीवरक्षक हे गपणतीचे विसर्जन करीत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion of Ganesha Idol on one and half day in Ganpati festival 2019