गणेशोत्सव2019 : मातीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या नोटांचा गणपती (व्हिडिओ)

जयेश गावंडे
Tuesday, 10 September 2019

अकोल्यातील मनकर्णा प्लॉट येथील गणपती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारण ही तसेच आहे कारण हा बाप्पा माती चा नसून हा चक्क पैशाचा बाप्पा, होय मंडळी हा गणपती बाप्पा चक्क 25 लाख रुपयांच्या खऱ्या खुऱ्या नोटांपासून बनवला आहे.

गणेशोत्सव 2019
अकोला : अकोल्यातील मनकर्णा प्लॉट येथील गणपती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारण ही तसेच आहे कारण हा बाप्पा माती चा नसून हा चक्क पैशाचा बाप्पा, होय मंडळी हा गणपती बाप्पा चक्क 25 लाख रुपयांच्या खऱ्या खुऱ्या नोटांपासून बनवला आहे.

अकोल्यातील दिव्यांग कारागीर टिल्लू टावरी यांनी हा बाप्पा भगतसिंग गणेश मंडळाने बसविलेला आहे. विशेष म्हणजे या गणपतीसाठी जमविण्यात आलेल्या नोटा या काही लोकांकडून जमा करण्यात आल्या आहेत. या गणपतीच्या निर्मितीसाठी 25 लाख खऱ्या नोटा वापरण्यात आल्या असून, या गणपतीच्या रक्षणासाठी पोलिसांचा 24 तास कडक पहारा राहणार आहे. टिल्लू टावरी यांना हा गणपती बनविण्यासाठी तब्बल वीस दिवसाचा कालावधी लागला आज हा गणपती भक्तांच्या दर्शनसाठी खुला करण्यात आला आहे.

वीर भगतसिंग मंडळाचे टिल्लू टावरी हे दरवर्षी काही ना नवीन बाप्पा बनवीत असतात यापूर्वीही त्यांनी 11 लाखाचा बाप्पा बनविला आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, ही मुर्ती एका दिव्यांग कलाकाराने साकारली आहे. टिल्ली टावरी असे या कलाकाराचे नाव असून, त्याने 500- 2000 च्या नोटा कॅनवॉसवर पिनच्या माध्यमातून जोडून हा गणपती  बनवला आहे. टिल्लू टावरी हा गवळीपूरा परिसारात राहतो. ही मूर्ती साकारताना 10 रूपयांपासून ते 2000 रूपयांपर्यंतच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत. ही मुर्ती बनवीण्यासाठी टिल्लूला 20 दिवसांचा अवधी लागला. 

वीस दिवसाच्या कालावधी नंतर आज पैशांचा बाप्पा विराजमान झाल्यानंतर भक्त पैशाच्या बाप्पाला पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत तर हा बाप्पा सध्या अकोल्यात कुतूहलाचा विषय बनला आहे.टिल्लू टावरी हे दिव्यांग असताना देखील त्यांच्या तिल कल्पकता या पैशाचा बाप्पाच्या मूर्तीत अवतरीलय. खऱ्या खुऱ्या पैशाचा बाप्पा विसर्जन करण्यात येणार नसल्याचे टावरी यांनि सांगितले तर ज्यांनी बाप्पा बनविण्यासाठी पैसे दिले त्यांचे पैसेही ते परत करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganapati of real notes in akola made tillu tawari