Ganesh Festival : लातूरचा राजा गणेश मंडळावर डीजे लावल्याप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

''गणेशोत्सवाच्या काळात कोणीही डीजे लावून ध्वनी प्रदूषण करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल''.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक.

लातूर : गणेशोत्सवाच्या काळात डीजे लावू नये असे वारंवार सूचना देऊनही गणरायाच्या आगमनाच्या वेळी डीजे लावल्याप्रकरणी येथील लातूर राजा गणपती मंडळाच्या अध्य़क्ष व सचिवाविरोधात येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाला गुरुवारी (ता. १३) आनंदात सुरवात झाली आहे. गणेशोत्सव काळात डीजे लावू नये असे वारंवार पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाना सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील गुरुवारी गणरायाच्या मिरवणुकीवेळी लातूरचा राजा गणपती मंडळाने आयशऱ टॅम्पो क्र. एमएच १९ जे ३११२ यामध्ये डीजे लावून सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे या मंडळाच्या अध्य़क्ष व सचिवासह डीजे चालक व मालकाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या टॅम्पोसह डी़जे साहित्य व चार हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: The Chargesheet registered in Latur against ganesh mandal