Ganesh Festival : ‘श्रुणाली’चा पर्यावरणपूरक गणेशाेत्सव ठरताेय प्रेरणादायी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

अकाेला : कला गुणांना वाव देत उत्सव साजरे करणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. पण, त्यांचा हा वेगळा मार्ग इतरांसाठी मात्र नक्कीच प्रेरणादायी ठरताे. असाच काहीसा पथदर्शी अन् प्रेरणादायी गणेशाेत्सव श्रुणाली मागील पाच वर्षांपासून साजरा करत आहे.
गौरक्षण राेड स्थित सहकारनगर येथील रहिवासी चंद्रशेखर शेळके यांच्याकडे गत पाच वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशाेत्सवाला सुरुवात झाली. या गणेशाेत्सवाची मुहूर्तमेढ राेवली, ती त्यांची मुलगी श्रुणाली हीने.

सर्वत्र पर्यावरण बचाव, पर्यावरण पुरक गणेशाेत्सव अन् अशा विविध उपक्रमांतून श्रुणालीचं पर्यावरणाशी नातं जुळलं. त्यातूनच आपल्याही घरी पर्यावरण पूरक गणेशाेत्सवाची सुरुवात करावी, असा निश्चय तिनं केला. त्यावेळी श्रुणाली शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात ‘बीएससी’ला शिकत हाेती.

अंगी असलेल्या चित्रकलेसह इतर कलागुणांचा उपयाेग गणेशाेत्सवात करता येईल, म्हणून पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदाच वडिलांच्या मदतीने शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार केली. पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला अन् ठरल्याप्रमाणे घरातच पर्यावरण पूरक गणेशाेत्सवाची सुरुवात झाली.

मागील पाचा वर्षात श्रुणालीचा हा पर्यावरण पूरक गणेशाेत्सव परिसरात घराेघरी पाेहाेचला. शेजारच्या चिमुकल्यांच्या आग्रहास्तव श्रुणालीने त्यांनाही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मीतीचे धडे द्यायला सुरुवात केली. श्रुणालीने आपल्या कलागुणांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी उललेलं हे पाऊल सर्वांसाठीच विशेषत: तरूणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टाकाऊ वस्तूंपासून केले मखर
केवळ गणपतीची मूर्तीच नव्हे, तर गणेशाच्या सभामंडपाला आकर्षक बनविण्यासाठी केलेले मखर देखील पर्यावरण पूरकच केले. त्यासाठी श्रुणालीने पेपरची रद्दी आणि जुन्या टाकाऊ वस्तूंचा उपयाेग करून आकर्षक अशा झाडाची निर्मीती केली. या मखरामुळे श्रुणालीच्या पर्यावरण पूरक गणेशाेत्सवाचे आकर्षण वाढले.

पर्यावरण संवर्धनासाठी आपला देखील हातभार लाभावा, या उद्देशाने अंगी असलेल्या कलागुणांच्या सहाय्याने पर्यावरण पूरक गणेशाेत्सवाला सुरुवात केली. यासाठी कला शिक्षक प्रताप राठाेड यांनी मार्गदर्शन केले. शिवाय कुटुंबियांचा देखील सहभाग असताे. अशाच पर्यावरण पूरक गणेशाेत्सवासाठी प्रत्येकाने आग्रह धरावा.
- श्रुणाली चंद्रशेखर शेळके

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco friendly Ganpati in Akola by Shrunali Shelke