चुरमा लाडू : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये 'हा' प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपीखास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... 

चुरमा लाडू -
2 मोठी वाटी गव्हाच्या जाडसर पीठात अर्धा कप तूपाचे मोहन घालून मिक्स करा. त्यात अर्धा कप पाणी टाका आणि मिश्रण मळून घ्या. हे मिश्रण छाकून अर्धा तास ठेवा. मळलेल्या पीठाची हाताने मुठीया (लांबट गोळे) बनवा. कढईत तेल गरम करा. त्यात मुठीया तळून घ्या. गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मुठीया तळून घ्या आणि एक ते दिड तास थंड व्हायला ठेउन द्या. त्यानंतर मुठीयाचे हातानेच लहान लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सर मधून पावडर होईपर्यंत बारीक करा. ही बारीक मुठीया पावडर बाजूला ठेवा. गॅसवर एका पॅनमध्ये कमी आचेवर 2 चमचा तूप, त्यात दिड कप बारीक केलेला गुळ टाकून मिक्स करत रहा. गुळाला विरघळू द्या, शिजवू नका. आच बंद करुन अर्धा चमला विलायची पूड त्यात टाका. एक चिमूट जायफळ पावडरही मिक्स करा. आता बारीक मुठीया पावडरमध्ये गुळाचे मिश्रण, नारळाचा कीस 2 चमचे, ड्रायफ्रुट्स, अर्धा चमचा खसखस टाकून मिक्स करा. 3-4 मिनिटासाठी थंड व्हायला हे मिश्रण ठेवा. पुन्हा हाताने मिक्स करा आणि लाडू बांधा. चुरमा लाडू तयार. 

उकडीचे मोदक
चॉकलेट शिरा मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची...
केळीचे मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
सेवन वडी : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
मक्याचा उपमा : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
कुडूमुलु : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
गोड बुंदी : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganapati special churma laadu recipe