पिंपरी कॅंप, गावात प्रबोधनपर देखावे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 September 2017

पिंपरी कॅंप व पिंपरीगावातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व समाज प्रबोधनपर देखाव्यांवर भर दिला आहे. पिंपरीगावातील अमरदीप तरुण मंडळाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’, तसेच नदीचे प्रदूषण यावर आधारित ‘एक स्वप्न’ अर्थात ‘निसर्गाचे संवर्धन’ हा जिवंत देखावा केला आहे. ज्योती मित्र मंडळाने दहा मूर्तींच्या साह्याने ‘शिवशाहीच्या न्यायाचा देखावा’, तर स्वराज्य प्रतिष्ठानाने ‘स्वराज्य ते सुराज्य’ हा देखावा केला आहे. सुपर मित्र मंडळाने जय मल्हार मंदिर व त्यास आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा केला आहे. न्यू भारत मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणारा देखावा केला आहे. डी.

पिंपरी कॅंप व पिंपरीगावातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व समाज प्रबोधनपर देखाव्यांवर भर दिला आहे. पिंपरीगावातील अमरदीप तरुण मंडळाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’, तसेच नदीचे प्रदूषण यावर आधारित ‘एक स्वप्न’ अर्थात ‘निसर्गाचे संवर्धन’ हा जिवंत देखावा केला आहे. ज्योती मित्र मंडळाने दहा मूर्तींच्या साह्याने ‘शिवशाहीच्या न्यायाचा देखावा’, तर स्वराज्य प्रतिष्ठानाने ‘स्वराज्य ते सुराज्य’ हा देखावा केला आहे. सुपर मित्र मंडळाने जय मल्हार मंदिर व त्यास आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा केला आहे. न्यू भारत मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणारा देखावा केला आहे. डी. वॉर्ड फ्रेंड सर्कलने भक्ती-महालाचा भव्य देखावा सादर केला आहे. ओम साई मित्र मंडळाने तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा उभारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pimpri ganesh ustav