दीडशे कलाकारांकडून अथर्वशीर्ष पठण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

पुणे -  गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील दीडशे कलाकारांनी एकत्र येऊन कसबा गणपती मंदिरात "श्रीं'ची आरती केली. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण सादर करून "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आनंदाचे रंग भरले. 

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून महापालिकेच्या सहकार्याने चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, एकपात्री कलाकार, शाहीर परिषद, बालगंधर्व परिवार, लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, मॅप, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, रंगभूमी सेवक संघ, साउंड-लाइट जनरेटर असोसिएशन या संस्था-संघटनांनी एकत्र येऊन "श्रीं'ची आरती केली. 

महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबरच गायक आनंद भाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रवींद्र मंकणी, राहुल सोलापूरकर, लीला गांधी, सुधीर गाडगीळ, मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh ustav