#BappaMorya गणेशभक्तांनी पेठा गजबजल्या 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 September 2018

पुणे - ढोलताशाच्या गजरात, श्रींची सामूहिक आरती करीत, विविध क्षेत्रांतील नेतेमंडळींना आमंत्रणे देत अनेक मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत असून, मध्यवर्ती पेठांतील प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद उत्सवाच्या सहाव्या दिवशी अनेक पुणेकरांसह परदेशी नागरिकांनीही घेतला. गणेशभक्तांनी पेठांही गजबजून गेल्या होत्या. 

पुण्यनगरीचा गणेशोत्सव पाहायला आलेल्या परदेशी नागरिकांनी दिवसभर विविध पेठांतील मंडळांना भेटी दिल्या. तसेच, बाप्पांचा देखावा पाहिला. रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त देखावे पाहत होते. त्यामुळे संपूर्ण शहरातच रात्री उशिरापर्यंत उत्साहाचे वातावरण जाणवत होते. देखावे पाहायला नागरिक घराबाहेर पडल्याने मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी जाणवत होती. मात्र, त्या कोंडीचा त्रास वाहनचालकांच्या चेहऱ्यावर नव्हता. अनेक मंडळांचे देखावे पूर्ण झाले असल्याने, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारीदेखील मध्यवर्ती भागात गणेशभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे. 

राजकीय, सामाजिक क्षेत्रासहित चित्रपट कलाकारांनीही विविध मंडळांना भेटी देत श्रींचे दर्शन घेतले. 

मानाच्या पाचही मंडळांसहित प्रमुख मंडळांच्या श्रींस नारळाचे तोरण वाहण्यासाठी सकाळपासूनच भाविक पुण्यनगरीत येत होते. जिवंत देखावे पाहत समाजप्रबोधनाचा विचार घेऊन पुढच्या मंडळातल्या विद्युत रोषणाईचा देखावा असो की, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक विषयांचा देखावा असो. विविध ठिकाणचे देखावे पाहत पाहत पुण्याचा गणेशोत्सव मोबाईलच्या कॅमेऱ्यात व व्हिडिओव्दारे रेकॉर्डिंगही तरुणाई करीत होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 crowd in pune city