Ganesh Festival :नातवाच्या श्रद्धेतून शेख कुटुंबीय गणेशभक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सोमाटणे - चौथीत शिकणाऱ्या अन्वर शेखची बाप्पावर अपार श्रद्धा.. किंबहुना बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्या मनोकामना पूर्ण करतो, ही त्याची धारणा.. त्यातूनच त्याने आपल्या घरातही गणपती बसवायचा, असा हट्टच धरला. त्याच्या या श्रद्धेपुढे अखेर शेख कुटुंबीयांना नतमस्तक व्हावे लागले, आणि हे कुटुंब गणेशभक्त झाले. गणेशोत्सवातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडवले आहे.

वर्गमित्रांच्या घरी बसविल्या जाणाऱ्या गणपतीमुळे अन्वरला गणेशोत्सवाबाबत कुतूहल निर्माण झाले. अल्पावधीतच त्याची या बाप्पावर श्रद्धाच बसली. त्यानंतर चौथीत शिकत असताना त्याने आपले आजोबा माजी सरपंच उस्मानभाई शेख, मामा पोलिस पाटील समीर शेख यांच्याकडे गणपती बसविण्याचा हट्ट धरला. उस्तानभाईंनीही त्याचा या श्रद्धेला तडा जाऊ न देता घरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये गणपती बसविला. सुरवातीला धार्मिक विधींची फारशी माहिती नसल्याने त्यांनी भटजींचे सहकार्य घेऊन दहा दिवस पूजा आरती व धार्मिक कार्यक्रम केले. या उपक्रमात सर्व कुटुंब उत्साहाने सहभागी झाले. आता तर, ते दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणपती बसवितात. या उत्सव काळात हातातील सर्व कामे बाजूला ठेवून त्यात मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. तो म्हणाला,‘‘लहानपणापासून माझी गणेशावर खूप श्रद्धा आहे. या श्रद्धेतूनच मी अखंडपणे गणेशोत्सव साजरा करतोय.’’ तर, उस्मान शेख म्हणाले, ‘‘माणूस हाच धर्म असून, सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत. त्यामुळे आम्हीही तितक्‍याच मनोभावे गणेशोत्सव साजरा करतो.’’

यंदाचे पाचवे वर्ष
यंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष असून, या वर्षी त्यांचा बाप्पा अकरा दिवसांनंतर विसर्जित होणार आहे. सर्व धार्मिक विधी यथासांग व्हावी, यासाठी ते दरवर्षी गुरुजींना बोलवितात. प्रतिष्ठापनेनंतर रोज शेख कुटुंब पहाटे उठून आरती करतात. चांगली आरास करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अन्वर तर मोठी तयारी करतो. शाळेत जाण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर तो सजावटीत दंग झालेला असतो. 

Web Title: ganesh festival 2018 Sheikh family Ganesh devotees