
वाघोली - गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सोसायटी धारक करीत आहे. अनाथांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी उपक्रम सोसायटी मंडळ राबवित आहेत. या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून होत आहे.
वाघोली - गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सोसायटी धारक करीत आहे. अनाथांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी उपक्रम सोसायटी मंडळ राबवित आहेत. या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून होत आहे.
न्याती इलान गणेश उत्सव मंडळाने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. बकोरी गावाजवळील डोंगरावर सुमारे 250 वृक्षाचे रोपण मंडळाने केले. माहेर या अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेतील मुलाना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात 50 हुन अधिक जणांनी रक्तदान केले. तर आरोग्य निदान शिबिरात 100 पेक्षा अधिक जणांची तपासणी करण्यात आली. यासाठी आयमॅक्स हॉस्पिटल व पूना ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. या ठिकाणी माणुसकीची भिंत हा उपक्रमही राबविण्यात आला. तेथे जमा झालेल्या वस्तू अनाथ आश्रमात देण्यात आल्या. या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, चंद्रकांत वारघडे, डॉ रामकर, मंडळाचे पदाधिकारी, सोसायटीधारक उपस्तीत होते.
आव्हाळवाडी रोड वरील ग्रँड व्हॅनटीला सोसायटी मंडळाच्या वतीने माहेर संस्थेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उपसरपंच संदीप सातव व संतोष सातव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने सोसाटीत करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रवीण पोखरकर, लक्षुमन उचाळे, भरत बदाडे, शिवाजी चव्हाण, शांताराम गाडगे, सुनील गवळी, प्रा.संपत नवले, डॉ सुमेध शिंगणापूरे, बालाजी शेटे, प्रशांत काळे आदी उपस्तीत होते.