Ganesh Festival : करवीर संस्थान गणेशोत्सव (व्हिडिआे)

बी. डी. चेचर
Thursday, 13 September 2018

कोल्हापूर - शहरात गणेशोत्सवास गुरुवारी (ता.13) उत्साहात सुरुवात झाली. करवीर संस्थानच्या गणपती आगमनाची पालखी मिरवणूक पारंपारिक लवाजम्यासह पापाची तिकटी येथून नवीन राजवाड्याकडे सकाळी दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली.

कोल्हापूर - शहरात गणेशोत्सवास गुरुवारी (ता.13) उत्साहात सुरुवात झाली. करवीर संस्थानच्या गणपती आगमनाची पालखी मिरवणूक पारंपारिक लवाजम्यासह पापाची तिकटी येथून नवीन राजवाड्याकडे सकाळी दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली.

महापालिका, सीपीआर चौक मार्गे महावीर कॉलेजपासून कसबेकरांच्या बंगल्यावर गणेशमुर्तीची पालखी विश्रांतीसाठी थांबली. तेथे कसबेकरांचा पालखी पुजनाचा मान असल्याने तेथील महिलांनी व पुरुषांनी गणेशमुर्तीचे दर्शन आणि पुजन केले. त्यानंतर पालखी थेट नविन वाड्यावर आली.

स्वागतासाठी श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे यांच्यासह राजघरांण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते. पालखीचे आगमन झाल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे यांनी गणेशमुर्तीस पुष्प वाहिले. याज्ञसेनी महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे, मधुरिमाराजे व यशस्वीनीराजे यांनी गणेशाचे औक्षण केले. राजोपाध्ये बाळासाहेब दादर्णे, आदिनाथ चिखलकर, राजाराम शिंगे यांनी पुजा - आरती झाली. श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, यशराजे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Karveer Santham Ganeshoushav