Ganesh festival : शेवटचे पाच दिवस बारापर्यंत ध्वनिवर्धक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 September 2018

पुणे : गणेशोत्सवातील शेवटच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकाच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी शेवटच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याला यश आल्याची माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh festival last five days allowed sound system Till twelve