बारामतीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

बारामती शहर - पर्यावरण संतुलनाचा संदेश केवळ पुस्तकातील धडे वाचून देण्यापेक्षाही स्वनिर्मितीचा आनंद घेत हा संदेश देण्याचा प्रयत्न बारामतीच्या बहुसंख्य शाळातील विद्यार्थी सध्या करताना दिसतात. येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीची चळवळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविली जात आहे. यंदाही तालुक्‍यातील १५ शाळा यात सहभागी असून, दोन हजारांहून अधिक मूर्तीची निर्मिती विद्यार्थ्यांद्वारे होणार आहे. 

शहरात यंदाही जवळपास दोन हजार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या घटणार असून, विद्यार्थी आपल्या हाताने घडविलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रदूषण कमी करण्यात फोरमला यश मिळाल्याचे फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना साचे, माती आदी साहित्य पुरविले जात आहे. त्यामुळे हातांनी मूर्ती साकारत असून, त्यांना यापासून नवनिर्मितीचाही आनंद मिळत आहे. मुलांच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक कुटुंबात प्रदूषणमुक्तीचा संदेशही यानिमित्ताने जात असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

आपणही काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्‍वास मुलांमध्ये निर्माण होतो व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करायचा नाही, हा संदेश हळूहळू मुलांमुळे कुटुंबापर्यंत जाऊ लागला आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘फोरम’मार्फत हा उपक्रम सुरू असून, त्याचे यश समोर येऊ लागले आहे.

उपक्रमात सहभागी शाळा... 
मएसोचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर, अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल, आर. एन. अग्रवाल टेक्‍निकल हायस्कूल, जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय, श्री छत्रपती शाहू हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, धो. आ. सातव (कारभारी) हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, श्रीमती गंगूबाई कृष्णाजी काटे देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ, विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, काटेवाडी हायस्कूल काटेवाडी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 Eco Friendly Ganpati Murti Child