Ganesh Festival : घरोघरी गणेश विराजमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पिंपरी - गणपती बाप्पाऽ मोरयाऽऽ, मंगलमूर्तीऽ मोरयाऽऽ... असा जयघोष, घंटानाद आणि मंत्रपुष्पांजली अशा वातावरणात लाडक्‍या गणरायाचे गुरुवारी (ता. १३) घरोघरी स्वागत झाले. संपूर्ण शहरात दिवसभर बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होती. ब्राह्ममुहूर्त साधत काहींनी पहाटेच घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे घराघरांतील वातावरण मंगलमय झाले होते.

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी या मध्यवर्ती भागांसह पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, वाकड, सांगवी, रावेत परिसरात गणपती विक्रीचे स्टॉल सजले होते. तेथून मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू होती. बच्चे कंपनी बाप्पाचा जयजयकार करण्यात आघाडीवर होती. चिंचवड गावातील काही भक्तांनी पुणेरी पगडी व धोतर अशी वेशभूषा केलेली होती. काही बच्चे कंपनी वाद्य वाजवत बाप्पाचा जयघोष करीत होती. कुणी पायी, कुणी दुचाकीवर, तर कुणी चारचाकी वाहनांमधून बाप्पांना घरी नेऊन विराजमान केले. गणेशमूर्ती स्टॉलच्या परिसरात पूजा साहित्य, उपरणे, वस्त्र विक्रीची दुकाने सजली होती. लाडक्‍या बाप्पाला हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून जयघोष करीत भाविक घराकडे निघत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati bappa is coming home