Ganesh Festival : माढात होणार गणेशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम एकत्रित

The gathering will be organized in Ganeshotsav and Moharams programs at madha solapur
The gathering will be organized in Ganeshotsav and Moharams programs at madha solapur

माढा (जि. सोलापूर) : येथील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व राजाबाग संवर पंजा, मिरावली साहेब पंजा, हजरत मलिक साहेब पंजा, पठाणसाहेब पंजा व शुक्रवार पेठेतील अजिंक्यातारा गणेश मंडळ व पठाण साहेब पंजा, गालिशाबाबा पंजा, गालिशाबाबा ताबूत यांनी गणेशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम एकत्रित करण्याचा निर्णय घेतला असून गणेश मूर्ती व मोहरमचे पंजा व ताबूत यंदा एकाच ठिकाणी स्थापन होणार आहेत. 

माढयातील दोन सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव व मोहरम एकाच ठिकाणी केला जातो. एरवी गणेशोत्सव व मोहरम वेगवेगळया दिवशी येत असल्याने ते स्वतंत्रपणे साजरे केल जात होते. परंतु यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित आले आहेत. त्यामुळे एकाच सार्वजनिक ठिकाणी उत्सव करण्यात अडचणी येऊ लागल्या. परंतू माढयातील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळांनी जागेची कोणतीच अडचण न करता एकाच ठिकाणी गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरे करण्याचा निर्णय मंडळाचे व पंजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फारशी चर्चा न करता घेतला. त्यामुळे माढयातील सामजिक सलोखा व एकोपा पुन्हा एकदा सर्वांसमोर आदर्शवत ठरला आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही गणेशमंडळांनी मोहरमाच्या विविध कार्यक्रमाचा उल्लेखही आपापल्या दहा दिवसांच्या कार्यक्रमपत्रिकेत केला आहे. 
शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळाने तर विदयुत रोषणाई, मंडप, ध्वनीक्षेप यासह सर्व खर्चाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. या ठिकाणी गालिशाबाबाचे दोन पंजे, पठाणासाहेब पंजा, गालिशाबाबा ताबूत व अजिंक्यतारा गणेशमंडळाची गणेशमूर्ती एकाच छताखाली असणार आहे. मंडळाने पंजे व ताबूत स्थापना व विसर्जनाचा कार्यक्रमही मंडळाच्या पत्रिकेत घेतला आहे. 

येथील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व चार ताबूतांच्या मोहरमचे कार्यक्रम एकत्रित होणार आहेत. कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळाचा गणपती मंडई पटांगणात बसविण्यात आला असून तेथेच शेजारी मोहरमचा एक ताबूतही बसविण्यात येणार आहे. उर्वरीत तीन ताबूत कसबा पेठतच मंडळाच्या जवऴपास आहेत. त्यामुळे विदयुत रोषणाई व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंडळ व चारही ताबूतचे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केले आहे. 

हिंदू - मुस्लिम बांधव यंदा एकत्रित गणेशोत्सव व मोहरम करणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com