Ganesh Festival : गणेशोत्सवानिमित्त आकाराला आले 'गोवर्धनवाडी' हे गाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 September 2018

'गोवर्धनवाडी'त प्राथमिक आरोग्य केंद्र, एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, पैलवान आखाडा, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, साडीचे दुकान, मंदिर, पथदिवे, मराठी आणि इंग्रजी शाळा, गावकट्टा, शेती, बैलबंडी, घोडा गाडी ऑटो आणि गावकरी या सर्वांना सुरेख स्थान दिले आहे.

पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे पुरुषोत्तम गिरीधर पाटील यांनी. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी एक रंगीबेरंगी गाव हडपसर येथील त्यांच्या स्वरविहार या राहत्या सोसायटीच्या गणपतीसमोर वसवले आहे.

Pune Ganapati Decoration

68 वर्षीय पुरुषोत्तम पाटील यांना चित्रकला आणि अशा रंगीबेरंगी कलाकृती साकारण्याची आवड आहे. 'शेती व्यवसाय करत असल्याने मला ग्रामीण भागाची विशेष ओढ आहे', असे पाटील आजोबा सांगतात. 'गोवर्धनवाडी' असे या गावचे नाव आहे. या गावातून रेल्वेरुळही गेला आहे. याशिवाय 'गोवर्धनवाडी'त प्राथमिक आरोग्य केंद्र, एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, पैलवान आखाडा, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, साडीचे दुकान, मंदिर, पथदिवे, मराठी आणि इंग्रजी शाळा, गावकट्टा, शेती, बैलबंडी, घोडा गाडी ऑटो आणि गावकरी या सर्वांना सुरेख स्थान दिले आहे. हे गाव साकारताना एलईडी लाईट्स चा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. 

Ganapati Decoration Pune

'गोवर्धनवाडी' उभी करण्यासाठी पाटील यांना 3 महिन्यांचा कालावधी लागला. पाटील यांनी स्वतः या गावातील एकुण एक गोष्टीवर मेहनत घेतली आहे. या कलाकृतीत वापरण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या मुर्त्या आणि वाहने बनविण्यासाठी शाडूची माती, लाकूड, रंगीबेरंही कागद आणि पुठ्ठे यांचा उपयोग केला आहे.


ganapati decoration pune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punes Senior Citizen decorates a village on the occasion of ganesh festival