Ganesh Festival : ‘दगडूशेठ’ने साकारले श्री राजराजेश्वर मंदिर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाने तमिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर महादेव मंदिर साकारले आहे. या मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्‌घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष  अशोक गोडसे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाचे यंदा १२६ वे वर्ष आहे. 

अकराव्या शतकाच्या सुरवातीला साकारलेल्या श्री राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. मोतिया रंगाच्या लाखो दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले आहे. या मंदिराला तमीळ भाषेमध्ये बृहदेश्वर मंदिर किंवा बृहदीश्वर मंदिर असे म्हटले जाते. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केली असल्याने राजराजेश्वर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. 

या प्रतिकृतीच्या गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेले कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारले आहेत. हे मंदिर १३ मजली असून, ७५ बाय १०० फूट आकाराचे आहे. मंदिराची उंची ९० फूट आहे. लाकूड, प्लायवूड आदी साहित्य वापरून त्यानंतर रंगकाम करण्यात आले आहे. तसेच त्यावर दिवेदेखील बसविले आहेत.

Web Title: shrimant dagdusheth halwai decoration Shri Raj Rajeshwar Temple