बालगोपाळांचा लाडका गणराय 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

बालकांना आवडणारी गणेशाची रूपे त्यांनी स्वत- घडविलेल्या मूर्ती व चित्रांमधून ठिकठिकाणी दिसत आहेत. हे वातावरण पुण्यात जवळपास सर्व शाळा व रंजन केंद्रांमध्ये बघायला मिळते आहे. 

बालकांना आवडणारी गणेशाची रूपे त्यांनी स्वत- घडविलेल्या मूर्ती व चित्रांमधून ठिकठिकाणी दिसत आहेत. हे वातावरण पुण्यात जवळपास सर्व शाळा व रंजन केंद्रांमध्ये बघायला मिळते आहे. 

सारसबागेसमोरील गरवारे बालभवन व प्रभात रस्ता परिसरातील डॉ. कलमाडी श्‍यामराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पनेनुसार दाखवलेली गणरायाची विविध रूपे मन मोहून घेत आहेत. बालभवनमध्ये दर वर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक बालकाने आपल्या हातांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारली आहे. तीन ते बारा वयोगटातील सुमारे 300 मुलांनी गटाच्या ताईंच्या मार्गदर्शनानुसार मूर्ती तयार केल्या. प्रत्येकाने आपापल्या मूर्तीला वेगळेपण देण्यासाठी खूप विचार केला. कुणी व्यायाम करणारा, तर कुणी पुस्तक वाचणारा गणराय घडविला. विशेष म्हणजे गणपतीसाठी मोदक, पेढे, केळी वगैरे तऱ्हेतऱ्हेचा खाऊही त्यांनी शाडूच्या मातीतून घडवून मूर्तीसमोर मांडला आहे. 

कलमाडी हायस्कूलमधील मुला-मुलींनी गणेशाची अनेक चित्रे रेखाटली आहेत. ती उत्तम ठरावीत म्हणून चित्रकला शिक्षकांकडून शेवटचा हात फिरवून घेतला आहे. सध्या या शाळेतील अनेक विद्यार्थी गणेशाची चित्रे घरून काढून आणून शिक्षकांना दाखवतात. शाबासकी मिळवतात. गणपतीबरोबरच त्याचे वाहन असलेल्या मूषकाचे व नैवेद्य म्हणून मोदकाचे चित्र काढायला आवडते, असे अनेक विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Variety Ganesh Idols