Ganeshotsav 2022: पौष्टिक नागलीचे मोदक कसे तयार करायचे?

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना पौष्टिक गोष्टींचा देखील विचार करावा आणि ट्राय करून बघा पौष्टिक नागलीचे मोदक
Ganeshotsav modak 2022
Ganeshotsav modak 2022Esakal

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना पौष्टिक गोष्टींचा देखील विचार करावा आणि ट्राय करून बघा पौष्टिक नागलीचे मोदक. सगळीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास पौष्टिक नागलीचे मोदक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे गणपती बाप्पा करीता पौष्टिक नागलीचे मोदक कसे तयार करायचे याची रेसिपी...

Ganeshotsav modak 2022
Mushroom Recipe: घरच्या घरी बनवा, टेस्टी मटर मशरूम मसाला

साहित्य:

● पाऊण वाटी नागलीचं पीठ

● अर्धा वाटी कणिक

● पाव वाटी ज्वारीचं पीठ

● अर्धा चमचा वेलची पूड

● एक वाटी साजूक तूप

● चवीनुसार पिठी साखर

Ganeshotsav modak 2022
Ukadiche Modak Recipe: उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी

कृती:

नागलीचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करायला ठेवावं. नंतर सर्व पिठं एकत्र करुन मग खमंग खरपूस भाजून घ्यावे.अंदाजे तूप सुटपर्यंत पीठ भाजावे.

पीठ भाजलं की ते एका ताटात काढून घ्यावे. भाजलेलं पीठ पूर्ण थंड होवू द्यावं. पीठ थंड झाल्यावर त्यात चवीनुसार पिठी साखर घालावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी पीठ गरम असताना पिठी साखर घालु नये. त्यामुळे साखरेच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मोदक मऊ होत नाहीत.

पिठ थंड झाल्यावर त्यात पिठी साखर आणि वेलची पूड घालावी. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावं. थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन ते मऊ करुन त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदक करायचे नसल्यास याच मिश्रणाचे लाडू वळले तरी चालतात. वेगळ्या आणि खमंग चवीचे नागलीचे मोदक किंवा लाडू छान लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com