Ganeshotsav modak 2022
Ganeshotsav modak 2022Esakal

Ganeshotsav 2022: गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक कसे तयार करायचे?

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना पौष्टिक गोष्टींचा देखील विचार करावा

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना पौष्टिक गोष्टींचा देखील विचार करावा आणि ट्राय करून बघा गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक. सगळीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास गव्हाच्या पिठाचे पौष्टिक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे गणपती बाप्पा करीता गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक कसे तयार करायचे याची रेसिपी...

Ganeshotsav modak 2022
Ganeshotsav 2022: सणासुदीत मोदक, फराळ बनवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या ‘ती’ची व्यथा

साहित्य

दोन कप गव्हाचे पीठ

एक कप साजूक तूप

अडीच चमचे काजूचे काप

अडीच चमचा पिस्त्याचे काप

दोन चमचे खसखस

एक चमचा वेलची पावडर

एक कप गूळ

अर्धा कप खोबरा किस

Ganeshotsav modak 2022
Ukadiche Modak Recipe: उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी

कृती:

सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. त्यानंतर काजूचे काप आणि पिस्त्याचे काप तूप टाकून भाजून घ्यावे. त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तूप टाकून त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून मंद आचेवर किमान 10 ते 15 मिनिटे छान सुगंध येईपर्यंत आणि पीठातून तुप सुटेपर्यंत सतत पीठ भाजून घ्यावे. ज्या पद्धतीने आपण बेसन पिठाच्या लाडूसाठी पीठ जशा पद्धतीने भाजतो तसेच हे गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे. हे पीठ भाजत असताना थोडं थोडं जसं लागेल तसं तूप टाकायचे आहे. हे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप तूपाचा वापर करायचा आहे त्यापेक्षा जास्त तूपाचा वापर करायचा नाही. आता भाजलेल्या गव्हाच्या पीठामध्ये अर्धा कप खोबरा किस टाकून ते सुद्धा एक मिनिटं पीठासोबत भाजून घ्यावे. आता पीठ, खोबरं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये गूळ टाकून हा गूळ फक्त वितळवून आणि एक उकळी येऊन घ्यायची आहे. गुळाला उकळी आल्यावर त्यामध्ये गव्हाचे भाजलेले पीठ, काजू-पिस्त्याचे काप, खसखस टाकायची आहे. त्यानंतर वेलची पूड घाला. आता सर्व पदार्थ एकत्र करुन एकजीव करा आणि गॅस बंद करा. आता हे सर्व पीठ थंड करुन घ्या आणि मोदकाच्या सहाय्याने तुम्ही याचे मोदक तयार करुन घ्या. अशा पद्धतीने गव्हाच्या पीठाचे मोदक तयार होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com