Ganeshotsav 2022: पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे?

उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही.
Ukadiche Modak
Ukadiche Modak Esakal

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना पौष्टिक गोष्टींचा देखील विचार करावा आणि ट्राय करून बघा पौष्टिक ज्वारीच्या मोदक. सगळीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास पौष्टिक नागलीचे मोदक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे गणपती बाप्पा करीता पौष्टिक

ज्वारीच्या मोदक कसे तयार करायचे याची रेसिपी...

Ukadiche Modak
Mava Modak: कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार मावा मोदक कसे करायचे?

साहित्य:

● एक खोवून घेतलेले नारळ

● दीड वाटी बारीक चिरलेला गूळ

● अर्धा चमचा वेलची पूड

● दोन वाट्या ज्वारीचं पीठ

● दोन वाट्या पाणी

● मीठ

● थोडी साखर

● एक चमचा तांदळाची पिठी

● एक चमचा साजूक तूप

Ukadiche Modak
Ukadiche Modak Recipe: उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी

कृती :

ज्वारीच्या पिठाचे मोदक करताना आधी सारण तयार करुन घ्यावं. सारणासाठी नारळ फोडून ते खोवून घ्यावं. मोदकांसाठी खोबरं किसून घेण्यापेक्षा खोवून घ्यावं. खोबरं खोवलं की गॅसवर कढई ठेवावी. त्यात अर्धा चमचा तूप घालावं. तूप गरम झालं की खोबरं परतून घ्यावं. नंतर त्यात किसलेला गूळ घालावा.

मिश्रण चांगलं परतून घ्यावं. ते एकदम कोरडं करु नये. बोटांना मिश्रण चिकट लागलं की गॅस बंद करावा. सारणात एक छोटा चमचा तांदळाची पिठी घालून सारण हलवून घ्यावं. नंतर त्यात वेलची पूड घालून सारण पुन्हा एकजीव करुन थंड होवू द्यावं.

सारण थंड होईपर्यंत ज्वारीच्या पिठाची उकड काढावी. आधी ज्वारीचं पीठ पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यावं. जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत पाणी गरम करण्यास ठेवावं. पाण्यात थोडं मीठ, छोटा चमचा साखर आणि एक चमचा साजूक तूप घालावं. पाण्याला उकळी आली की त्यात ज्वारीचं पीठ घालावं. गॅसवरुन भांडं उतरवून पीठ भराभर ढवळावं.

पीठ ढवळलं की पुन्हा ते गॅसवर ठेवून भांड्यावर झाकण ठेवून उकडीला दोन ते तीन वाफा काढाव्यात. उकड मळून घेण्यासाठी पसरट ताट घ्यावं. ताटाला तूप लावून उकड मळून नरम करावी. उकड मळून झाली की मोदक पात्रात किंवा भांड्यात पाणी ठेवून ते उकळावं. पाण्याला उकळी फूटेपर्यंत मळलेल्या उकडीची पारी करुन त्यात सारण भरुन मोदक करावेत. ते मोदक पात्रात किंवा चाळणीत ठेवून् 10-12 मिनिटं उकडावेत.

मोदक उकडल्यानंतर गॅस बंद करावा.2-3 मिनिटांनी झाकण काढून मोदकांची वाफ निघून जावू द्यावी आणि नंतर उकडलेले मोदक एका भांड्यात काढून घ्यावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com