गणराया, दुष्काळग्रस्त अन् पुरग्रस्त शेतकऱ्यांना शक्ती दे; केसरकरांचे साकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - महाराष्ट्रात एकीकडे पुर तर दुसरीकडे दुष्काळ अशी विचित्र परिस्थिती यंदा आली आहे. दोन्हीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शक्ती गणरायाने द्यावी, असे साकडे आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घातले. 

सावंतवाडी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे पुजन केल्यानंतर त्यांनी हे साकडे घातले. 

श्री. केसरकर म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळ आहे. तेथे परतीचा पाऊस चांगला पडू दे. तेथील दुष्काळ हटू दे. अशी प्रार्थना मी गणरायाकडे केली आहे. यंदा पावसाने जिल्ह्यात नऊ हजार हेक्टरवरील शेती वाहून गेली आहे. नदीने आपले प्रवाह बदलले आहे. यंदा फार मोठे आव्हान सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहीले आहे. या सर्वांना तातडीने मदत शासनाने पुरवली आहे. पण या नुकसानग्रस्तांना तातडीने उभे राहण्याची शक्ती गणरायाने द्यावी अशी मी प्रार्थना केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Deepak Kesarkar comment on Ganesh Festival