तुमच्या लाडक्या बाप्पाचं वाहन उंदीरच का माहितीये ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

why mouse was vehicle of Ganesha know the interesting story

तुमच्या लाडक्या बाप्पाचं वाहन उंदीरच का माहितीये ?

Ganesh Festival 2022: कुठल्याही कामाची शुभ सुरूवात ज्यांच्या नावाने केली जाते असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बाप्पा. बाप्पाचा नैवेद्य, बाप्पाचे आवडते मोदक हे सगळ्यांनाच माहितीये. पण तुमच्या लाडक्या बाप्पाचं वाहन उंदीरच का असा विचार तुमच्या कधी मनात आलाय का? असा प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल असं नाही. चला तर यंदा गणेशोत्सव सुरू होण्याआधी जाणून घेऊया बाप्पा आणि त्यांचं वाहर उंदीर यांची रंजक कथा. (why mouse was vehicle of Ganesha know the interesting story)

पुराण कथांमध्ये सांगितल्या जातं की, देवराज इंद्रांच्या दरबारी एक क्रोंच नावाचा गंधर्व होता. अप्सरांसोबत गंमत जंमत करता त्याचा पाय चुकून मुनि वामदेव यांच्यावर पडला. भर रागात त्यांनी क्रोंचला श्राप दिला. या श्रापानंतर क्रोंच थेट पराशर ऋषींच्या आश्रममध्ये उंदीर रूपात पडला. या आश्रमात जाऊनही त्याने आश्रमातील धान्यापासून ते ऋषीमुनींच्या कपड्यांपर्यंत नुकसान केले. याच आश्रमात भगवान गणेश राहात होते.

गणेशांनी या उंदराला धडा शिकवण्याचं ठरवलं. उंदराला पकडण्यासाठी गणेशांनी त्याच्यावर जाळं फेकलं. हे जाळं त्याचा पाठलाग करत अखेर पाताललोकात पोहोचत उंदाराच्या गळ्यात अडकलं. तेव्हा जीव वाचवत उंदीर गणेशजींजवळ पोहोचला. यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. मात्र त्याला शुद्ध येताच त्याने बाप्पाजवळ त्यांचे प्राण वाचवण्याची विनंती केली. तेव्हा बाप्पांनी त्याला त्यांचं वाहन बनवून घेतलं.

पुराणामध्ये आणखी एक कथा मानली जाते. सुमेरु पर्वतावर एका ऋषीच्या पत्नीचं हरण करण्याचा क्रोंचने प्रयत्न केला होता. त्यावेळी रागात ऋषींनी क्रोंचला तू उंदीर होशील असा श्राप दिला होता. तर तिसरी कथा म्हणजे सर्व देवता त्रस्त होऊन गजमुखासुर राक्षसाची तक्रार घेऊन गणेशाजवळ गेले होते. त्यावेळी त्याला धडा शिकवण्यासाठी गणेशाने त्यांना चांगली धूळ चाखवली. त्यावेळी जीवाच्या भीतीने हा राक्षस उंदीर झाला होता. तेव्हा त्याने क्षमा मागितल्यानंतर बाप्पांनी त्याला त्यांचं वाहन बनवून घेतलं होतं.