भारत व चीनचा लष्करी सहकार्यावर भर 

शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (यूएनआय) : भारत व चीनमधील लष्करी सहकार्य व व्यूहरचनात्मक संबंध दृढ करण्याचा निर्धार गुरुवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला.  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले, तर चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे यांनी चीनचे नेतृत्व केले. "भारत -चीनमधील लष्करी सहकार्य आणि व्यूहरचनात्मक संबंध बळकट करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला,' असे ट्विट सीतारामन यांनी केले.

नवी दिल्ली (यूएनआय) : भारत व चीनमधील लष्करी सहकार्य व व्यूहरचनात्मक संबंध दृढ करण्याचा निर्धार गुरुवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. 

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले, तर चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे यांनी चीनचे नेतृत्व केले. "भारत -चीनमधील लष्करी सहकार्य आणि व्यूहरचनात्मक संबंध बळकट करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला,' असे ट्विट सीतारामन यांनी केले.

गेल्या सहा वर्षांत भारताला भेट देणारे जनरल वी हे चीनचे पहिले संरक्षण मंत्री आहेत. 2017मधील डोकलाम वादानंतरची चिनी लष्करी अधिकाऱ्यांची ही पहिली उच्चस्तरिय बैठक होती. जनरल वी हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून मंगळवारी (ता.21) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. चिनी प्रसारमाध्यमांनाही या उच्चस्तरिय बैठकीचे स्वागत केले आहे.