कमला हॅरिस बनू शकतात अमेरिकेच्या महिला अध्यक्ष

पीटीआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नेत्या कमला हॅरिस यांच्याकडे अमेरिकेच्या पहिला महिला अध्यक्ष होण्याची क्षमता आहे, असे मत येथील प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नेत्या कमला हॅरिस यांच्याकडे अमेरिकेच्या पहिला महिला अध्यक्ष होण्याची क्षमता आहे, असे मत येथील प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेत बुधवारी (ता. 8) झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा अनपेक्षित विजय झाला आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांचे या जागतिक महासत्तेच्या पहिला महिला अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. यानंतर लगेचच येथील प्रसिद्धिमाध्यमांनी कमला हॅरिस यांच्याकडे अमेरिकेच्या अध्यक्षा होण्याची पात्रता असल्याचे वृत्त दिले आहे.

हॅरिस यांची कॅलिफोर्निया राज्यातून सिनेटपदी निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतरविरोधी व सामूहिक हद्दपारीच्या भूमिकेला विरोध करीत देशपातळीवर मोहीम सुरू केली आहे.

हंग्स्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे, की कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनू शकतात. कॅलिफोर्नियाच्या लोकप्रिय ऍटर्नी जनरल यांना आता राजधानीकडे कूच केले आहे. सिनेट निवडणुकीत त्यांनी इतिहास रचला असून ऍटर्नी जनरल म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्यासारख्या बड्या डेमोक्रॅट नेत्यांचाही त्यांना पाठिंबा आहे. यामुळे 2020 च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम होईल. देशभरात त्यांच्याबद्दल अनुकूल मत असेल असा अंदाज या लेखात व्यक्त केला आहे.

Web Title: Kamala Harris can become Women president of the United States