कुलभूषण जाधव यांची कुटूंबियांशी भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 25 डिसेंबर 2017

इस्लामाबाद - पाकिस्तानातील दहशतवादी कारवाईंवर नजर ठेवणारे भारतीय गुप्तहेर असा पाकिस्तानने आरोप केलेले भारतीय कुलभूषण जाधव हे गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आज सोमवार (ता.25) ते पाकिस्तानने परवानगी दिल्यानंतर इस्लामाबाद येथे आपल्या आई आणि पत्नीशी भेटले. ताब्यात घेतल्यापासून कुलभूषण यांना भारतातील कुणाशीही भेटण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती.   

या भेटीत इंटरकॉमने 40 मिनिटे कुटूंबियांशी बोलण्याची परवानगी दिली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील परराष्ट्र मंत्रालयातील कार्यालयात कुलभूषण आणि त्यांच्या कुटूंबाची भेट घडवून आणली. ही भेट थेट न होऊ देता भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव हे काचेच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. भारतीय माजी नौदल अधिकारी असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने 'रॉ'चे हेर असल्याचा आरोप केला होता. यासंबंधी चाललेल्या खटल्यात पाकिस्तानच्या रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

या भेटीदरम्यान, कुलभूषण जाधव, त्यांची आई आणि पत्नी यांच्यासमेत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त जे. पी. सिंह उपस्थित होते. आज संध्याकाळीच त्यांची आई आणि पत्नी दिल्लीला परतणार आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलुचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 ला अटक केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने पाकिस्तानच्या कुलभूषण यांना फाशी देण्याच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Islamabad Pakistan Kulbhushan Jadhav India Family Meet