रशियाकडून भारतास "आण्विक निमंत्रण'

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

फास्ट रिऍक्‍टर हा आण्विक भट्टीचा वैशिष्टयपूर्ण प्रकार असून यामध्ये "फास्ट न्यूट्रॉन्स'च्या सहाय्याने न्युक्‍लिअर फिशनच्या साखळी प्रक्रियेवर नियंत्रण मिळविता येते. या भट्टीच्या सहाय्याने समाजास आवश्‍यक असलेली उर्जा पुरविण्याबरोबरच, पर्यावरणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या किरणोत्सारी कचऱ्यावर पुन:प्रक्रियेच्या समस्येवर उत्तर शोधणेही शक्‍य असल्याचा आशावाद झागोर्नोव्ह यांनी व्यक्त केला

मुंबई - रशियाच्या आण्विक भट्टी विकसित करण्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सहभागी व्हावे, असे निमंत्रण रशियाकडून भारतास देण्यात आले आहे. रशियामधीला उल्यानव्हस्क भागामधील दिमित्रोव्हग्राड येथील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये रशियाकडून बहुउद्देशीय फास्ट रिऍक्‍टर विकसित करण्यासंदर्भातील प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

आण्विक उर्जेसाठी नवीन तंत्रज्ञानाचे व्यासपीठ तयार करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याची माहिती येथील प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या अलेक्‍झांडर झागोर्नोव्ह यांनी दिली आहे. रोसातोम ही प्रसिद्ध रशियन कंपनीची या भट्टीची बांधणी करत आहेत. या कंपनीचे दक्षिण आशियामधील केंद्र सुरु करण्यासाठी झागोर्नोव्ह हे सध्या भारत भेटीवर आले आहेत. या भेटीमध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडला.

फास्ट रिऍक्‍टर हा आण्विक भट्टीचा वैशिष्टयपूर्ण प्रकार असून यामध्ये "फास्ट न्यूट्रॉन्स'च्या सहाय्याने न्युक्‍लिअर फिशनच्या साखळी प्रक्रियेवर नियंत्रण मिळविता येते. या भट्टीच्या सहाय्याने समाजास आवश्‍यक असलेली उर्जा पुरविण्याबरोबरच, पर्यावरणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या किरणोत्सारी कचऱ्यावर पुन:प्रक्रियेच्या समस्येवर उत्तर शोधणेही शक्‍य असल्याचा आशावाद झागोर्नोव्ह यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केला.

भारतातील कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पाच्या बांधणीमध्ये रोसातोम कंपनीचा सहभाग आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून मांडण्यात आलेला हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Web Title: russia invites india to jointly build Fast reactor