नुसरत जहाच्या या फोटोमुळे चाहते घायाळ

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 16 October 2019

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहांने आपल्या इंन्स्टाग्राम वर एक फोटो अपलोड केला आणि म्हटलं की, शेड्स ऑफ लाईफ.  या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

कोलकता : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहांने आपल्या इंन्स्टाग्राम वर एक फोटो अपलोड केला आणि म्हटलं की, शेड्स ऑफ लाईफ.  या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

यासोबतच नुसरतने कमेंट बॉक्समध्ये आपली मैत्रीण मिमी चक्रवती ला विचारलं की, बोनुआ. मी मेकअप ठीक केलाय का? यावर मिमीचा रिप्लाय तर आलेला नाही परंतु नुसरतच्या चाहत्यांनी तीला प्रतिक्रीया दिल्या आहेत. 
नुसरतच्या चाहत्यांनी या फोटोला 50 हजारापेक्षा जास्त लाइक्स दिले आहेत.

या फोटोत तीने पांढरा टॉप, हूप ईयररिंग्स आणि घड्याळ असा पेहराव केला आहे. ज्याला चाहते म्हटले की, तुम्ही खुप सुंदर दिसता, एका चाहत्याने म्हटलं की, तुम्ही खासदार आहात, फोटो टाकण्यापेक्षा काम करा. नुसरत बंगाली अभिनेत्री असल्याने त्यांच्या चाहत्यांची संख्या खुप आहे. आपल्या सुंदरतेमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता इंस्टाग्रामवरील त्यांच्या फोटोमुळे तीचे चाहते घायाळ झाले आहे. नुसरत 2019च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या टिकीटावर निवडुन आली.