‘सकाळ समूहा’चा आंतरराष्ट्रीय सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ मंगळवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी वॅन-इफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला.

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच वॅन-इफ्राच्या रिसर्च अँड मटेरियल टेस्टिंग सेंटरचे प्रमुख आनंद श्रीनिवासन समारंभाला उपस्थित होते. सध्या येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पब्लिशिंग एक्‍स्पो २०१६ दरम्यान हा कार्यक्रम झाला. या एक्‍स्पोमध्ये प्रिंट वर्ल्ड २०१६ आणि डिजिटल वर्ल्ड २०१६ अशी दोन सत्रे होत आहेत.

या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. जगभरातील २६ देशांतील १२८ वृत्तपत्रांचा या स्पर्धेत सहभाग होता. भारतातून ३१ वृत्तपत्रांचा सहभाग होता. प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लब २०१६ ते २०१८ या वर्षासाठी एकूण ६४ प्रकाशनांच्या ८५ वृत्तपत्रांनी हे सदस्यत्व पटकावला. 

या वृत्तपत्रांना आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व देण्यात आले. जागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१ मध्ये स्थापना झाली. छपाईच्या गुणवत्तेचे मानांकन करण्यासाठी १९९४ पासून इफ्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लबद्वारे दर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात येते.

इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वालिटी क्‍लब

‘इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वॉलिटी क्‍लब’ २०१६ - १८ ही स्पर्धा या आधीच्या स्पर्धांपेक्षा कठीण होती. यात प्रत्येक वृत्तपत्राने जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांतल्या एका आठवड्यात छापलेले अंक परीक्षणासाठी जमा केले होते. छपाईचा दर्जा कायम राहावा, यासाठी ही स्पर्धा उपयोगी ठरते. या स्पर्धेत मिळालेले यश हे सहभागी प्रकाशन संस्था, वाचक आणि जाहिरातदारांना चांगल्या प्रतीचे वृत्तपत्र देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे निदर्शक मानले जाते.

Web Title: sakal group international honor by wan-infra award

टॅग्स