गुगलमध्ये "ऍप डेव्हलपर्सना' संधी

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जुलै 2016

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमात "गुगल‘नेही आता सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पाऊल उचलले आहे. याद्वारे भारतातील "अँड्रॉईड डेव्हलपर्स‘साठी कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेद्वारे देशातील 20 लाखांहून अधिक तरुणांना ‘मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट‘चे दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे "गुगल‘ने सोमवारी सांगितले.

"भारतातील सध्याची तंत्रज्ञानातील प्रगती पाहता 2018 पर्यंत देशात 40 लाखांहून अधिक ‘ऍप्लिकेशन डेव्हलपर्स‘ असतील,‘ असा अंदाज ‘गुगल‘चे अधिकारी कैसर सेनगुप्ता यांनी व्यक्त केला.

कसा करायचा हा अभ्यासक्रम?
या विकास कार्यक्रमासाठी "गुगल‘ने देशातील विविध विद्यापीठांमध्ये प्रशिक्षकही निवडले आहेत. तसेच, भारतातील खासगी, सरकारी विद्यापीठे, प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमातही याची सुविधा उपलब्ध असेल. याची सुरवात 18 जुलैपासून होणार आहे.

अभ्यासक्रम
मोबाईल ऍप्लिकेशन विकसनामध्ये जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचे नाव अग्रभागी यावे यासाठी सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या कौशल्य विकसनाच्या उपक्रमात भारतातील जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी हा अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने तयार केला आहे.

रोजगाराची हमी
हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर "गुगल‘ एक परीक्षा घेणार आहे. यात चमकदार कामगिरी करणाऱ्यांना ‘अँड्रॉईड डेव्हलपर‘ म्हणून काम करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
 
Web Title: Google launches Android Certificate and Skilling program in India