पाकिस्तानमधून गायब झालेले ते दोन भारतीय अधिकारी सापडले, पण...

टीम ई-सकाळ
Tuesday, 16 June 2020

पाकिस्तानचे दोन अधिकारी दिल्लीच्या परिसरात हेरगिरी करत असताना त्यांना भारतीय पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यानंतर त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते.

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तात काम करणारे दोन भारतीय अधिकारी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांना पाकिस्ताने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांना सोमवारी उशीरा सोडून देण्यात आले आहे. रस्त्ये अपघात प्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दोन्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे पाकिस्तानी चलनाच्या 10 हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहेत, असा आरोपही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 29 औषधांची ओळख; भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश

अधिकाऱ्यांनी नकली नोटा बाळगल्याचा आरोप भारताने साफ फेटाळून लावला आहे. शिवाय दोन्ही भारतीय अधिकाऱ्यांना अनेक तास पोलीस कस्टडित ठेवण्यात आले होते. पाकिस्तान विनाकारण भारतीय अधिकाऱ्यांना खोट्या प्रकरणात गोवत आहेत, असा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. शिवाय या दोन भारतीय अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचंही सूत्रांकडून कळत आहे.काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर भारतीय अधिकाऱ्यांचा पाठलाग आणि त्यांना त्रास देत असल्याचे वृत्त येत होते. त्यानंतर दोन भारतीय अधिकारी गायब झाल्याने खळबळ उडाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून आयएसआयच्या गुप्तचरांचा भारतीय उच्चायुक्त गौरव अहलुवालीया यांच्या निवासस्थानातील वावर वाढला होता. 

'ते' शब्द मनाला वेदनादायक वाटायचे; ब्रिटन अर्थमंत्र्यांची दाहक प्रतिक्रिया

पाकिस्तानचे दोन अधिकारी दिल्लीच्या परिसरात हेरगिरी करत असताना त्यांना भारतीय पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यानंतर त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दोन अधिकारी बेपत्ता होण्याची घटना घडली होती. त्यामुळे पाकिस्तान बदला घेण्यासाठी काही योजना आखत आहे काय? अशी शंका घेतली जात होती. साऊथ ब्लॉक या घटनेकडे लक्ष ठेवून होते. तसेच भारतीय मिशनने यासंबंधीची तक्रार पाकिस्तानकडे केली होती. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असताना या घटनेने ते अधिक बिघडण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  The two Indian officers who went missing from Pakistan were found but