भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

इस्तंबूल विमानतळावर पेगासस एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून घसरून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 179 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये प्रवाशांसह एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. धावपट्टीवरून विमान घसरल्याने झालेल्या या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले.

इस्तंबूल : इस्तंबूल विमानतळावर पेगासस एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून घसरून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 179 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये प्रवाशांसह एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. धावपट्टीवरून विमान घसरल्याने झालेल्या या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपघातातील जखमींवर शहरातील 18 रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती तुर्कस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

Image result for Airliner skids, breaks into three parts in Istanbul

खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याचे समजते. धावपट्टीवर पाणी साठले होते. त्यामुळे विमान धावपट्टीवरून 50 ते 60 मीटर घसरले, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: दकAirliner skids breaks into three parts in Istanbul 3 dead 179 injured