PTI Leader : क्रिकेट खेळून परतणाऱ्या पीटीआय नेत्यावर रॉकेट हल्ला; हल्ल्यात 10 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Rocket Attack

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, या हल्ल्यात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

PTI Leader : क्रिकेट खेळून परतणाऱ्या पीटीआय नेत्यावर रॉकेट हल्ला; हल्ल्यात 10 ठार

पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजकीय उलथापालथीबरोबरच अंतर्गत परिस्थितीही चांगली नाहीये. दहशतवाद शिगेला पोहोचला आहे.

अबोटाबादमधील पीटीआय (PTI leader) या प्रमुख विरोधी पक्षाचा स्थानिक नेता आतिफ मुन्सिफ खान (Atif Munsif Khan) हा प्रतिस्पर्धी गटानं केलेल्या हल्ल्यात ठार झाला आहे. या हल्ल्यात एकूण 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या वृत्तानुसार अबोटाबादचे डीपीओ उमर तुफैल यांनी सांगितलं की, 'हवेलियन तहसीलचे महापौर आतिफ एका कारमधून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या कारच्या इंधन टाकीवर गोळी झाडली, त्यामुळं कारला आग लागली आणि स्फोट झाला.'

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, या हल्ल्यात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी अबोटाबाद जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

आतिफ मुन्सिफ यांनी 2022 च्या खैबर पख्तुनख्वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अबोटाबादच्या हवेलियन तहसीलमधून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला आणि नंतर पीटीआयमध्ये सामील झाले. त्यांचे वडील मुन्सिफ खान जादून केपी विधानसभेचे माजी सदस्य आणि प्रांतीय मंत्री होते. त्यांचीही 1990 च्या दशकात हत्या झाली होती. हल्ल्यानंतर मुन्सिफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो मृत्यूच्या काही तास आधी लंगडा गावात मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

टॅग्स :Pakistanglobal news