शरीफ यांच्या अटकेसाठी 10 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जुलै 2018

पाकिस्तान मुस्लिम लिगचे नेते नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम सध्या लंडनहून पाकिस्तानकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 'ईवाय243' या विमानातून ते पाकिस्तानात येत आहेत.

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ लाहोरला जात आहेत. भ्रष्टाचारप्रकरणात त्यांना आज (शुक्रवार) अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारप्रकरणात शरीफ आणि मरियम दोषी आढळले असल्याने त्यांना पाकिस्तानात परताच अटक होणार आहे.

पाकिस्तान मुस्लिम लिगचे नेते नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम सध्या लंडनहून पाकिस्तानकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 'ईवाय243' या विमानातून ते पाकिस्तानात येत आहेत. लाहोर अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वासहाच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर परतल्यानंतर त्यांना इस्लामाबादला एका हेलिकॉप्टरने नेले जाणार आहे. त्यानंतर त्यांना अदियाला कारागृहात नेण्यात येणार आहे. 

याबाबत शरीफ म्हणाले, देश आता कठीण प्रसंगातून जात आहे. मी जे करू शकत होतो, ते मी के्ले. मला 10 वर्षांची शिक्षा सुनावल्याची मला माहिती आहे. मला आता कारागृहात नेण्यात येणार आहे. मात्र, मला पाकिस्तानी जनतेला सांगायचे, की मी जे काही केले ते फक्त तुमच्यासाठी केले.

Web Title: 10 thousand cops Nawaz Sharif daughter Maryam to be arrested in Lahore