हजार वर्ष जुन्या हत्यारांचा संच सापडला

पीटीआय
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

संशोधक या हत्यारांविषयी माहिती देताना असे म्हणाले, ''स्कँडिनेव्हियामध्ये यापूर्वी अशी हत्यारे सापडली आहेत. परंतु, हत्यारांचा असा संपूर्ण संच प्रथमच सापडला आहे''

कोपनहेगन (डेन्मार्क) - डेन्मार्क येथील एका वर्तुळाकार किल्ल्यामध्ये केलेल्या उत्खननात संशोधकांना स्कँडिनेव्हियाच्या व्हायकिंग जमातीच्या हजार वर्षांपूर्वीच्या हत्यारांचा संच सापडला आहे. या संचातील हत्यारांचा वापर घरे आणि जहाज बांधणीत किंवा दागिने बनविण्याच्या कामात केला गेला आसावा असा प्राथमिक अंदाज संशोधकांनी मांडला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या हत्यारांच्या या संचात जवळजवळ चौदा लोखंडी हत्यारांचा समावेश आहे. या हत्यारांना असलेल्या लाकडी आवरणाचे मात्र फक्त अवशेष उरले आहेत. या हत्यारांपैकी काही चमच्याच्या आकाराचे ड्रील आहेत जे लाकडाला छिद्र करण्यासाठी वापरले जात असावे. याव्यतिरिक्त एक लहान पक्कड आणि दागिने बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रॉपप्लेटचाही यात समावेश आहे.

ज्या किल्ल्यामध्ये ही हत्यारे सापडली आहेत तो दहाव्या शतकात डॅनिश राजा हेरॉल्ड याच्या कारकिर्दीत बांधला गेला असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे.

व्हिडिओ सौजन्य - Future Science & Technology youyube

Web Title: 1,000-year-old Viking toolbox discovered in mysterious fortress

व्हिडीओ गॅलरी