Ecuador : इक्वेडोरमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप; १२ जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ecuador

Ecuador : इक्वेडोरमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप; १२ जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वायासमध्ये भूकंप इतका तीव्र होता की संपूर्ण शहरात त्याचे धक्के जाणवले. अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.(12 dead after 6.8 magnitude earthquake hits Ecuador )

'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'ने देशाच्या कोस्टल ग्वायस भागात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. भूकंपाचे केंद्र इक्वेडोरचे दुसरे सर्वात मोठे शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेस सुमारे ५० मैल (८० किलोमीटर) अंतरावर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा कुएनका येथे मृत्यू झाला. भूकंपाच्या वेळी तो कारमध्येच उपस्थित होता, तेव्हा अचानक इमारत त्याच्या अंगावर पडली. याशिवाय एल ओरो या किनारी राज्यामध्ये आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वेगवेगळ्या भागातून मृतांचा आकडा समोर येत आहे. आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं. यामध्ये 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ६ फेब्रुवारीला सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ४.१७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती.

टॅग्स :Earthquake