ट्रम्प यांचे 12 तासांत 1.40 कोटी फॉलोअर्स

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

ट्विटर अप्रामाणिक माध्यमांना टाळण्याचा मार्ग आहे. ट्विटरवरुन मला माझ्या समर्थकांच्या संपर्कात राहता येईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 12 तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने सुरु केलेल्या ट्विटर अकाऊंटला तब्बल 1.40 कोटी नागरिकांनी फॉलो केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे 2009 पासून ट्विटर वापरतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या ट्विटची नेहमी चर्चा असायची. ट्रम्प यांच्या खासगी अकाउंटला 2 कोटी 9 लाख फॉलोअर्स आहेत. 

ट्विटर अप्रामाणिक माध्यमांना टाळण्याचा मार्ग आहे. ट्विटरवरुन मला माझ्या समर्थकांच्या संपर्कात राहता येईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.
 
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावे @POTUS या नावाने अधिकृत ट्विटर हँडल चालवण्यात येते. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत ट्विटर अकाउंट बराक ओबामांसाठी चालवले जात होते. ओबामांच्या कार्यकाळात या अकाउंटवरुन केले गेलेले सगळे ट्विट @POTUS44 या नविन अकाउंट अंतर्गत संग्रहित ठेवले जाणार आहे.

Web Title: 12 Hours Post Inauguration, Trump Gaines 14 Million Twitter Followers