व्हर्जिनियात गोळीबारात 12 जण ठार 

पीटीआय
रविवार, 2 जून 2019

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात 12 जण मृत्युमुखी पडले, तर 6 जण जखमी झाले.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात 12 जण मृत्युमुखी पडले, तर 6 जण जखमी झाले. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखार ठार झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती घेतली असून, घडामोडींवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. 

डेवायने क्राडूक (वय 40) असे हल्लेखाराचे नाव असून, तो अभियंता होता आणि व्हर्जिनिया बिच सिटीच्या सार्वजनिक बहुउद्देशीय खात्यात नोकरीला होता. पोलिस कारवाईदरम्यान एक कर्मचारी जखमी झाला. बुलेटप्रूफ जॅकेट असल्याने तो फार गंभीर जखमी झाला नाही, असे पोलिसप्रमुख जेम्स केर्वेरा यांनी सांगितले.

हल्लेखोर व्यक्ती हा असमाधानी कर्मचारी होता. शहरातील व्हर्जिनिया म्युन्सिपल सेंटर इमारतीत हल्लेखोर घुसला आणि गोळीबार सुरू केला. 45 कॅलिबर हॅंडगनने त्याने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 killed in the Virginia Beach Shooting