13 मुलांना डांबून ठेवणाऱ्या आईवडिलांना अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

ही सर्व 13 मुले दोन ते 29 वर्षे वयोगटाचील असून सर्व जण कुपोषित आहेत. या मुलांना घरात पलंगावर साखळदंडानी बांधून ठेवलेले होते. तेथे अत्यंत अस्वच्छता होती व दुर्गंधीही येत होती. या मुलांना बांधून का ठेवले आहे, याचे कारण पालक देऊ शकले नाहीत, असे रिव्हरसाईड कॉउंटीच्या पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

पेरिस (कॅलिफोर्निया)  - पोटच्या मुलांचा छळ करून करणाऱ्या मातापित्याला कॅलिफोर्निया पोलिसांनी अटक केली. पेरीस येथील त्यांच्या घरातून 13 कुपोषित मुलांची सुटका केली. ताब्यात ठेवण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. 15) रात्री घडली.
या घरातील 17 वर्षीय मुलगी रविवारी पळून गेली. तिने सापडलेल्या मोबाईल फोनवरून पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिस घटनास्थळी पोचले व घरातील मुलांची सुटका केली. संबधित मुलगी एवढी अशक्‍त होती की ती फक्त दहा वर्षांचीच वाटत होती, असो पोलिसांनी सांगितले.

ही सर्व 13 मुले दोन ते 29 वर्षे वयोगटाचील असून सर्व जण कुपोषित आहेत. या मुलांना घरात पलंगावर साखळदंडानी बांधून ठेवलेले होते. तेथे अत्यंत अस्वच्छता होती व दुर्गंधीही येत होती. या मुलांना बांधून का ठेवले आहे, याचे कारण पालक देऊ शकले नाहीत, असे रिव्हरसाईड कॉउंटीच्या पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या प्रकरणी डेव्हिड ऍलेन (वय 57) आणि लुईस ऍना टरपिन (वय 49) या पालकांना पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 siblings held captive in filthy California home