पाकिस्तानमध्ये स्फोटात 15 जण ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

स्फोटानंतर सुरक्षा रक्षकांनी परिसरात नाकेबंदी केली असून, संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. खुर्रम एजन्सी हा अफगाणिस्तान सीमेजवळील आदिवासी भाग समजला जातो.

पेशावर - वायव्य पाकिस्तानमधील पराचिनार येथील बाजारात आज (शनिवार) सकाळी झालेल्या स्फोटात 15 जण ठार झाले असून, 30 जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या पराचिनारमधील इदगाह बाजारातील सब्जी मंडीमध्ये हा स्फोट झाला. भाज्यांच्या क्रेटमध्ये स्फोटके ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटात 15 जण जागीच ठार झाले आहेत. तर, 30 जण जखमी असून, त्यांना पराचिनार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर सुरक्षा रक्षकांनी परिसरात नाकेबंदी केली असून, संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. खुर्रम एजन्सी हा अफगाणिस्तान सीमेजवळील आदिवासी भाग समजला जातो. सीमेपलिकडून दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसखोरी करण्यासाठी सोपा मार्ग म्हणून हा भाग ओळखला जातो. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

Web Title: 15 killed in blast at vegetable market in northwest Pakistan