अमेरिकेतील मृतांची संख्या दीड लाखांहून अधिक

पीटीआय
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोना संसर्गाच्या बाबतीत जगात आघाडीवर असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येबाबतही अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. गरजेपेक्षा वेगाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाल्याने त्याचा फटका अमेरिकेला बसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

न्यूयॉर्क - कोरोना संसर्गाच्या बाबतीत जगात आघाडीवर असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येबाबतही अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. गरजेपेक्षा वेगाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाल्याने त्याचा फटका अमेरिकेला बसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उद्योग आणि इतर व्यवहार सुरु झाल्यानंतर हॉटेल, बार आणि जिममध्ये गर्दी करणाऱ्या युवकांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. मृत्यूसंख्येत अमेरिकेनंतर ब्राझील आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: ‎text that says "‎๑๐ද बाधित देश (मृतांच्या संख्येनुसार) आकडेवारी रात्री ९ पर्यंतची बाधित देश (रुग्णसंख्येनुसार) ะ 25 ด X 057 ל'לג'έ38 20 अमेरिका ब्राझील भारत 15 15 रशिया आफ्रिका मेक्सिको अमेरिका 24 2 ब्राझील ब्रिटन मेक्सिको भारत इटली‎"‎

जॉन हॉपकिन्स संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेत ४५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अर्थात, ही केवळ नोंदणीकृत संख्या असून जगातही प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीहून अधिक संख्येने रुग्ण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, इटलीमध्ये लॉकडाउन १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोना मृत्यूंच्या संख्येत काही आठवड्यांपूर्वी प्रथम क्रमांकावर असणाऱ्या या देशात रुग्णसंख्या वाढीचा दर कमालीचा घटला असला तरी जबर फटका बसल्यामुळे येथील सरकार आता पूर्ण काळजी घेत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.5 lakh plus deaths in America by coronavirus