9/11 : अमेरिकेची जखम 18 वर्षांनंतरही भळभळतेय...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अल्-कायदा ही संघटना मूळ अफगाणिस्तानी असल्याने या हल्ल्यांचा परिणाम हा अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारविरूद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरू केलेल्या युद्धात झाला.

न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी अठरा वर्षे पूर्ण झाली. 11 सप्टेंबर 2001 हा दिवस सर्व अमेरिकेच्या व जगाच्या कायम लक्षात राहण्यासारखाच. अल्-कायदा या दहशतवादी संघटनेने हा भीषण हल्ला घडवून आणला व या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता ओसामा-बिन-लादेन!

Image may contain: sky, cloud and outdoor

अल्-कायदाच्या केवळ 19 दहशतवाद्यांनी हा नरसंहार घडवून आणला होता. 11 सप्टेंबरच्या पहाटे बोस्टन व वॉशिंग्टन या विमानतळांवरून अमेरिकेच्या 4 प्रवासी विमानांचे या दहशतवाद्यांनी अपहरण केले व ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाणीवपूर्वक पाडण्यात आले. यातील दोन विमाने ही न्यूयॉर्कमधील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'या इमारतींमध्ये घुसवण्यात आली, यामुळे या दोन इमारतींना आग लागून त्या भस्मसात होऊन जमिनदोस्त झाल्या. तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय असणाऱ्या पेंटॅगॉन या इमारतीला धडकवण्यात आले. तर चौथे विमान अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया या राज्यातील गावात कोसळले. 

या हल्ल्यात विमानातील सर्व प्रवासी ठार झाले. एकूण 2996 नागरिकांचे या हल्ल्यात बळी गेले, तर 6000 नागरिक जखमी झाले. यात अमेरिकेचे सुमारे 720 अब्जांचे नुकसान झाले. आजही अमेरिका या हल्ल्यातून सावरलेली नाही. या हल्ल्यांमुळे तेथील नागरिकांना कर्करोग व श्वसनाचे असाध्य आजार झाले. अनेक कुटुंब, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. 

No photo description available.

अल्-कायदा ही संघटना मूळ अफगाणिस्तानी असल्याने या हल्ल्यांचा परिणाम हा अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारविरूद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरू केलेल्या युद्धात झाला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या ओसामा-बिन-लादेन याला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे 2011 साली ठार करण्यात आले.

Image may contain: 1 person, beard and close-up

अमेरिकेत या हल्ल्याचे स्मरण म्हणून एक 93 फूट उंच व 28 मीटर लांबीचा टॉवर बांधण्यात आला आहे. दरवर्षी 11 सप्टेंबरला या राष्ट्रीय स्मारकात येऊन हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांचे नातेवाईक एकत्र येऊन श्रद्धांजली वाहतात. 38,500 नागरिकांनी या हल्ल्यानंतर काही ना काही स्वरूपातील मदत हल्ल्याला बळी पडलेल्या लोकांसाठी केली. आजही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उपाध्यक्ष माईक पेन्स हे वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारकाला भेट दिली. तसेच उर्वरित दोन विमाने कोसळलेल्या इतर जागांना भेट दिली आणि श्रद्धांजली वाहिली.

No photo description available.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 years completed to attack on world trade center America