बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

न्यूयॉर्क : चार वर्षीय बालकाकडून बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे घडली. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

कॅलिफोर्निया येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी 53 वर्षीय आजोबाला अटक करण्यात आली. त्याने मुलाच्या हाताला लागेल अशा ठिकाणी बंदूक ठेवली होती. त्यामुळे अगदी सहजरित्या ही बंदूक मुलांच्या हाती लागल्याने ही गंभीर घटना घडली. सकाळी नऊच्या सुमारास झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. मॉस्कोच्या डुफ्फी स्ट्रिट परिसरात शुक्रवारी घडली.

याबाबत परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांनी सांगितले, की जेव्हा त्यांनी तिला बाहेर नेले. त्यानंतर तिला त्वरीत रुग्वाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 Year Old Accidently Shot By 4 Year Old Cousin In US