इमॅन्यूअल शार्पेंची, जेनफिर डाउडना यांना रसायन शास्त्रातील नोबेल

सकाळ ऑनलाईन
Wednesday, 7 October 2020

सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो. 

नवी दिल्ली- रसायन शास्त्रातील सन 2020 साठीच्या नोबेल पुरस्काराची बुधवारी (दि.7) घोषणा करण्यात आल. यंदाचा हा पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची (Emmanuelle Charpentier) आणि जेनफिर डाउडना (Jennifer A. Doudna) यांनी जीनोम एडिटिंगची पद्धत शोधल्याप्रकरणी मिळाला आहे. 

स्टॉकहोममध्ये स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या समितीने बुधवारी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मागील वर्षी लिथियम-आयन बॅटरीची निर्मिती केलेले शास्त्रज्ञ जॉन बी गुडइनफ, एम स्टॅनली विटिंघम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो. 

भौतिक आणि वैद्यक शास्त्रातील पुरस्काराची यापूर्वीच घोषणा

यापूर्वी कृष्णविवर संबंधीच्या शोधासाठी तीन शास्त्रांना यावर्षीचा भौतिक नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रिटनचे रॉजर पेनरोज, जर्मनीचे रेनहार्ड गेंझेल आणि अमेरिकेच्या अँड्रिया गेज यांना जाहीर करण्यात आला आहे. 

हेही वाचा- पुतिन यांचा वाढदिवस; रशियाने डागली जगातील सर्वात घातक क्रूज मिसाईल

तर वैद्यक शास्त्रातल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ हार्वे जे ऑल्टर, चार्ल्स एम राइस आणि ब्रिटनचे मायकल हफटन यांच्या नावाची घोषणा केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2020 Nobel Prize in Chemistry awarded to Emmanuelle Charpentier and Jennifer A. Doudna