अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातील नोबेल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

कवयित्री लुईस या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्क येथे झाला होता.

नवी दिल्ली- साहित्यातील सन 2020 चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लूक (Louise Glück) यांना जाहीर झाला आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. 

कवयित्री लुईस या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्क येथे झाला होता. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

हेही वाचा- Positive Story: 'मास्क-संजिवनी' देणारा 'हनुमान'; आतापर्यंत शिवून वाटले 6 हजार मास्क

2019 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मुळचे ऑस्ट्रियाचे असलेले पीटर हँडका यांना देण्यात आला होता. 

हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा- ड्रॅगनचा माध्यमांना इशारा; तैवानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख टाळा

रसायन, भौतिक आणि वैद्यक शास्त्रातील पुरस्काराची यापूर्वीच घोषणा

यापूर्वी कृष्णविवर संबंधीच्या शोधासाठी तीन शास्त्रांना यावर्षीचा भौतिक नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रिटनचे रॉजर पेनरोज, जर्मनीचे रेनहार्ड गेंझेल आणि अमेरिकेच्या अँड्रिया गेज यांना जाहीर करण्यात आला आहे. 

तर वैद्यक शास्त्रातल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ हार्वे जे ऑल्टर, चार्ल्स एम राइस आणि ब्रिटनचे मायकल हफटन यांच्या नावाची घोषणा केली होती. 

रसायन शास्त्रातील सन 2020 साठीच्या नोबेल पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची (Emmanuelle Charpentier) आणि जेनफिर डाउडना (Jennifer A. Doudna) यांनी जीनोम एडिटिंगची पद्धत शोधल्याप्रकरणी मिळाला आहे. भारत भारत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 2020 Nobel Prize in Literature is awarded to the American poet Louise Gluck