इराकमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; तिघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- आंदोलनामध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू

- 15 हजार जणांपेक्षा जास्त नागरिक जखमी

नसिरियाह (इराक) : दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आणखीन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये सातत्याने झटापट होत असल्याने आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनामध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हजार जणांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असल्याचे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी सांगितले. यावेळी आंदोलकांवर बळाचा वापर केल्यामुळे सुरक्षा दलाच्या 66 अधिकाऱ्यांच्या विरोधात इराक सरकारने खटला भरला असल्याचेही वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. 

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

दरम्यान, देशातील वाढती बेरोजगारी, आर्थिक सुधारणा, चांगले राहणीमान, समाज कल्याण आणि नागरी संस्थांमधील वाढता भ्रष्टाचार संपविण्याच्या मागण्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपासून येथील नागरिक रस्त्यावर उतरले असून, विद्यमान सरकारने राजीनामा देत देशात नवीन सरकार स्थापन केले जावे, अशी या आंदोलनाची मुख्य मागणी असल्याचेही सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dead in Iraq who agitated against Government