इंडोनेशियात तीन संशयितांना कंठस्नान

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये दहशतवादी हल्ले करण्याचे नियोजन केल्याच्या आरोपांखाली 14 संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

संशयितांना ताब्यात घेताना उडालेल्या चकमकीमध्ये तीन जण ठार झाले असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्‍त्याने दिली. संशयितांना अटक करण्यासाठी गेलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या दिशेने बॉंब फेकण्यात आला. मात्र, या बॉंबचा स्फोट झाला नाही. त्यानंतर चकमकीत तीन संशयित ठार झाले, असे सांगण्यात आले. जकार्तामध्ये हल्ले करण्याचे नियोजन करणाऱ्या 14 जणांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते.
 
Web Title: 3 suspects arrested in indonesia