बगदाद बॉंबस्फोटात 32 जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

बगदाद - इराकची राजधानी बगदादमधील सदर भागात गर्दीच्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती कार बॉंबस्फोटात 32 जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी "इसिस'ने स्वीकारली आहे.

बगदाद - इराकची राजधानी बगदादमधील सदर भागात गर्दीच्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती कार बॉंबस्फोटात 32 जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी "इसिस'ने स्वीकारली आहे.

बगदादमधील सदर भागात रोजगार मिळण्याची वाट पाहणाऱ्या कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हा भाग शिया बहुल असून, ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणी दहशतवाद्यांनी आत्मघाती कार बॉंबस्फोट घडवून आणला. मागील तीन दिवसांत बगदादमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बॉंबस्फोटात 32 जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

शनिवारी बगदादमधील एका व्यापारी भागात झालेल्या दुहेरी बॉंबस्फोटांत 27 जण मृत्युमुखी पडले होते. इराकमधील "इसिस'चा प्रभाव कमी होत असून, मोसूलमध्येच फक्त "इसिस'चे अस्तित्व शिल्लक राहिले आहे, त्यामुळे "इसिस'कडून बगदादमध्ये बॉंबस्फोट घडवून आणले असून, सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
"इसिस'ने सदर भागातील बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून, आमच्या जिहादींनी सुमारे 40 जण ठार केले असल्याचा दावा केला आहे, तसेच शनिवारी बगदादमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांची जबाबदारीही "इसिस'ने घेतली आहे.

Web Title: 32 dead in iraq blast